श्री खंडेराय प्रतिष्ठान कला क्रीडा महोत्सव अंतर हाउसिंग सोसायटी नाट्य स्पर्धेत ब्राउरिया सोसायटीच्या “निशिगंधा” नाटकाने पटकाविला प्रथम क्रमांक..

0

औंध :

श्री खंडेराय प्रतिष्ठान कला क्रीडा महोत्सव यांच्यातर्फे बालेवाडीतील अंतर हाउसिंग सोसायटी नाट्य स्पर्धा दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी पंडित भीमसेन जोशी नाटय़गृहात पार पडली. डॉ.सागर गणपतराव बालवडकर व प्रा. सौ. रुपालीताई सागर बालवडकर यांच्या संकल्पनेतून परिसरातील विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात आणखी एक भर पाडत विविध सोसायटीतील नागरिकांसाठी ही नाटय़ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गायक, संगीत दिग्दर्शक, कवी, लेखक सलील कुलकर्णी, अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्याहस्ते करण्यात आला.

या स्पर्धेबद्दल बोलताना डॉ. सागर बालवडकर म्हणाले की, बालेवाडी – औंध परीसरात फार मोठया प्रमाणात सोसायटी नागरिक राहत असुन त्यांच्या अंगात अनेक सुप्त गुण लपलेले आहेत. त्यांच्या या गुणांना वाव देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली होती. फार मोठया उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेत सहभागी होऊन विजेत पद मिळविण्यासाठी चुरस निर्माण केली. सर्वांनी अतिशय गुण कौशल्याने या स्पर्धेत रंगत निर्माण केली. भविष्यात देखील अश्याच विविध उपक्रमातून सोसायटी नागरिकांना सहभागी करून घेतले जाईल. विजयी झालेल्या सर्वांचे अभिनंदन आणि सहभागी होऊन चुरशीने लढत देणाऱ्या अप्रतिम सोसायटी नागरीकांना खुप खुप धन्यवाद.

अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात अतिशय चुरशीच्या फायनल सामन्यात तीन सोसायटीचे संघ विजेते ठरले.
ब्राउरिया सोसायटीच्या “निशिगंधा” या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला, नंदन प्रोस्पेरा या सोसायटीच्या रहस्यमय आणि चित्त थरारक “पर्यस” नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला. आपल्या पौराणिक सुंदर साहित्यावर आधारित “दाह” या ओर्वी सोसायटीतील नाटकाने तृतीय क्रमांक मिळविला.

सानिध्या देशमुख या लहान मुलीने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार तर सायली गुप्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिजीत दीक्षित सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले.

प्राची सिद्धीकी आणि सुशांत वायदंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व नियोजन बालेवाडी वुमन्स क्लबच्या वतीने करण्यात आले होते.

See also  सोशल डिस्टंसिंग व मास्क वापरत नाही अशा व्यावसायिकावर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई