सोशल डिस्टंसिंग व मास्क वापरत नाही अशा व्यावसायिकावर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई

0

पाषाण :

करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असल्याने, तसेच लोक सोशल डिस्टंसिंग व मास्क वापरत नाही असे वारंवार आढळून येते म्हणूनच नियम तोडणाऱ्या लोकांवरती वचक बसवण्यासाठी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17/02/2021 रोजी प्रभाग क्रमांक 8,9 बाणेर रोड , बालाजी चौक सुस रोड या ठिकाणी विनामास्क धारकांना व सोशल डिस्टेंस न पाळणाऱ्यां व्यवसाय धारकांवर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई मध्ये वरीष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, आरोग्य निरीक्षक जालिंदर चांदगुडे, निखिल निकम, नितीन लोखंडे, जया सांगडे व आरोग्य कोठी मोकादम, सेवक हजर होते. सदर कारवाईमध्ये 20 पावत्या व 19800 रू दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे लोकांवर वचक बसावा व त्यांनी काळजी घ्यावी या हेतूने महापालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली.

See also  सनी सुपर विक मध्ये मॉम्स मॅजिक स्पर्धत मधुरा फडके प्रथम.