शिवसेनेच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरात घरोघरी जाऊन हळदी कुंकू समारंभ साजरा

0

बाणेर :

शिवसेनेच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरात घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधून हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला.

करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता शिवसेनेने बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे परिसरात प्रत्यक्षपणे घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधून हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा केला. कोरोनाची पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी गर्दी टाळण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच माझे कुटुंब …माझी जबाबदारी याबाबत संवाद साधण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेच्या वतीने रोहिणी राजेंद्र धनकुडे, प्रतिभा धनकुडे, सुनिता धनकुडे, सोनाली धनकुडे, लीना लोंढे, सुभद्रा पारखे, सारिका जाधव, शीला तापकीर, सुजाता ननवरे, पुष्पा पवार, ऋतुजा जगताप ,सुषमा मुरकुटे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

See also  महेश सुतार यांचा समर्थकांनसह शिवसेनेत प्रवेश!