स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक अमोल बालवडकर : राजेश पांडे

0

बालेवाडी :

बाणेर-बालेवाडी प्रभागाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून चार वर्षे प्रभागात केलेल्या विकास कामाच्या चित्रफितीचे लोकार्पण केले. ‘अमोल बालवडकर क्विक रिस्पॉन्स टीम’ या संकल्पनेतून अमोल बालवडकर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करणार आहेत. यावर पुणे शहर भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत ‘स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक’ असल्याचे बोलून दाखवले. तसेच भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी, ‘क्विक नगरसेवकाने आता लोकांच्या तात्काळ मदतीसाठी क्विक रिस्पॉन्स टीम स्थापन केल्याबद्दल स्तुती केली’.

भाजप कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनित जोशी यांनी बोलताना भाजप पक्षाचं संघटन बाणेर-बालेवाडी प्रभागात मजबूत करण्यात अमोल बालवडकर यांचे मोलाचं योगदान असल्याचे बोलून दाखवले. प्रभागात २४/७ पाणी पुरवठा करण्यासाठी केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडला.

यावेळी कार्यक्रमात अनेकांनी अमोल बालवडकर यांना जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यामध्ये राजकीय नेते, आजी-माजी आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यासह प्रभागातील नागरिकांचा समावेश होता. तसेच कार्यक्रमाप्रसंगी पुणे शहराचे महापौर मुरलीधर(आण्णा) मोहोळ, शहराध्यक्ष जगदिशजी मुळीक, संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, पुनितजी जोशी, नगरसेवक किरण दगडे, नगरसेवक दिलिप वेडे पाटील, मा.महापौर, दत्तात्रय गायकवाड, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रकाशतात्या बालवडकर, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका सुनिता वाडेकर, भाजपा यु.मो.अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर, पिं.चि.मनपा मा.महापौर नितिन काळजे,

म्हाळुंगे सरपंच मयुर भांडे, हिंजवडी सरपंच गणेश जांभुळकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस सुनिल माने, राहुल कोकाटे, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, बाळा टेमकर, नगरसेवक संदिप कस्पटे, युवा नेते लहु बालवडकर, प्रकाशतात्या किसन बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, कोथरुड यु. मो. उपाध्यक्ष कृष्णा बालवडकर, प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, शिवम बालवडकर, बबनराव चाकणकर, लक्ष्मणराव सायकर, मनपा सहा-आयुक्त जयदिप पवार, बालेवाडी विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्ट व औंदुंबर ग्रुप चे सर्व सभासद, बालेवाडी अष्टविनायक मित्र मंडळ, श्री.शिवराज मित्र मंडळ, लक्ष्मीमाता मित्र मंडळ चे सर्व सभासद, वसुंधरा अभियान बाणेर, बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशन व प्रभागातील विविध सोसायटींमधील नागरीक तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद व मित्रपरिवार उपस्थित होते.

See also  बाणेर नागरी पतसंस्था चा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

पहा लोकार्पण सोहळा व्हिडिओ :