माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भव्य मोफत आरोग्य शिबिर…

0

औंध :

शिवाजीनगर चे माजी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी नगरसेवक सनी निम्हण मित्रपरिवार यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आबांनी नेहमीच सांगितले आहे की राजकारण करताना सामाजिक हित जोपासण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. राजकारण हे समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीने झाले पाहिजे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी प्रोत्साहित करणे व आरोग्य सुविधांबद्दल जनजागृती करत आरोग्यसेवा पुरविणे हे निरोगी समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक आहे. हाच उद्देश ध्यानात घेऊन, आम्ही सालाबादप्रमाणे कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत आहोत.

पुढे सनी निम्हण नागरिकांना आव्हान करताना म्हणाले की, या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणीसह अत्यंत महत्त्वाच्या विविध आरोग्य सेवा गरजू नागरिकांना मोफत पुरविल्या जाणार आहेत. या आरोग्य शिबिरात आपण आबालवृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबिराच्या माध्यमातून आपली आरोग्यसेवा आमच्या हातून घडेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

See also  औंध रोड -खडकी जंक्शन स्टेशन येथील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे