राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला दिमागदारपणे सुरुवात…

0

बर्मिंगहॅम :

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला ( Commonwealth Games 2022 ) ला सुरुवात झाली आहे. 28 जुलैपासून सुरू होणारे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. स्पर्धेबाबत खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारतीय संघाचे नेतृत्व स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी केले.

सिंधू आणि मनप्रीत भारतीय संघासमोर तिरंगा धरून ध्वजवाहक म्हणून पुढे गेले. दोघांच्याही चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण हास्य दिसून येत होते. त्यांच्यामागे जाणारे सर्व भारतीय खेळाडूही आत्मविश्वास आणि उत्साहाने परिपूर्ण दिसत होते. भारतीय दलात समाविष्ट असलेले सर्व पुरुष खेळाडू निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये आणि महिला खेळाडू एकाच रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसल्या.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जगभरातील 72 देश सहभागी झाले आहेत. यावेळीही 213 भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी भारतीय खेळाडू अधिकाधिक पदके आणून देशाचा मान वाढवण्याचे काम करतील, अशी अपेक्षा आहे. प्रिन्स चार्ल्स यांनी राष्ट्रकुल खेळांच्या अधिकृत सुरुवातीची घोषणा केली. यासह उद्घाटन समारंभाची सांगता झाली. इथून पुढे 11 दिवस जगातील 72 देशांतील खेळाडूंमध्ये आपापल्या देशासाठी अधिकाधिक पदक जिंकून देण्याची स्पर्धा रंगलेली दिसेल.

See also  अखेर रोहित ऑस्ट्रेलिया ला रवाना...