माजी नगरसेवक सनी निम्हण आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

0

औंध :

माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने घेण्यात आलेले प्रभाग क्र १२ औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील दहावी आणि बारावी परीक्षेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सोबतच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आज संपन्न झाले. औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती लाभली होती.

सुप्रसिद्ध करीअर सल्लागार विवेक वेलणकर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना 10 वी आणि 12 नंतर विविध क्षेत्रात करीयर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोर्सेसची सखोल माहिती दिली. कोर्स किंवा करीयर निवडताना काय निकष लावावे यासंदर्भात उत्तम मार्गदर्शन केले. या सत्रानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, गुणवंतांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रेरणादायी होता. सहभागी झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! पुढील दैदीप्यमान वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! करिअर मार्गदर्शन शिबिराचा फायदा उपस्थित विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. भविष्याचा वेध घेताना योग्य दिशा शोधण्यास मदत होईल. या शिबिरा द्वारे पालकांना देखील आपल्या पाल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणती दिशा द्यावी यासाठी अनेक पर्याय माहिती झाले.

या प्रसंगी मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, मा. स्विक्रुत नगरसेवक वसंतराव जुनवणे, औंध विश्वस्त मंडळांचे योगेश जुनवणे, सुप्रीम चौंधे, सचीन वाडेकर, प्रमोद कांबळे, गणेश शेलार, सचीन मानवतकर, वनमाला कांबळे, कुंभारताई, लता धायगुडे आदि उपस्थित होते.

See also  निवृत्त पोलिस संघटना व एन्जॉय ग्रुपच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कुमार साळुंखे यांचा सत्कार..