पी.ई. सोसायटी मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे ‘द ग्रेट इंडियन बुक टूर : बुक टॉक – बुक फैर – वर्कशॉप’ संपन्न

0

गणेशखिंड :

पी.ई. सोसायटी मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे कॉलेजच्या भाषा विभाग आणि केंद्रीय ग्रंथालय यांच्यातर्फे ‘ द ग्रेट इंडियन बुक टूर : बुक टॉक – बुक फैर – वर्कशॉप ‘ मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयातील लेखकांशी संवाद करण्यात आला.

लेखक दीपक श्रीवास्तव आणि उन्मेष मोहितकर आणि द ग्रेट इंडियन बुक टूरचे संचालक श्री प्रशांत गुप्ता उद्घाटनासाठी उपस्थित होते. त्याच बरोबर मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात सर, प्रा. सुरेश तोडकर सहकार्यवाहक पी. ई. सोसायटी, डॉ. प्रकाश दिक्षित उपकार्यवाहक पी.ई. सोसायटी उपस्थित होते. Odissey च्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळेस लेखक दिपक श्रीवास्तव , लेखक शंतनु शर्मा , लेखक विनोद कुमार , लेखक हेमाली जोशी , लेखक आधार कोठारे , लेखक गौतम मायकर , लेखक उन्मेश मोहितकर, लेखक ऐश्वर्या तिवारी , उपस्थित होते. लेखक विकाश गोयल,लेखक विनोद कुमार पहीलाजनी या सर्वांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे प्रश्नांची मैफिल रंगली.सफीर भोला यांनी वर्कशॉपमध्ये कवितेतील अनुभव व्यक्त केला.

डॉ.दिपनिता भांजा यांनी सूत्रसंचालन केले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य उपस्थित होते. डॉ. संगीता ढमढेरे ग्रंथपाल, डॉ. शंपा चक्रवर्ती यांनी समन्वय व्यक्त केले. शेवटी डॉ. संदीप सानप यांनी सर्वांचे आभार मानले. हा सर्व कार्यक्रम डॉ. संजय खरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

See also  ऑक्सिजन पुरवठा कमी पडू लागल्या मुळे आरोग्य सेवेत गोंधळ