आशियातील सर्वांत मोठा बायो-सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे

0

इंदुर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शनिवारी त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांना इंदूर येथील आशियातील सर्वांत मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे आमंत्रण दिले होते.

इंदूर येथील ट्रेंचिंग मैदानात 15 एकर जागेवर सीएनजी प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज 17 ते 18 टन सीएनजी गॅस तयार होणार आहे तसेच 100 टन जैविक खताचेही उत्पादन घेतले जाणार आहे. या खताचा वापर जैविक शेतीसाठी करण्यात येणार आहे. एकूण तीन टप्प्यात गॅस तयार होणार आहे. जिल्हा प्रशासन या सीएनजी गॅसचा वापर सार्वजनिक वाहतुकीसह कॉर्पोरेशनच्या बसमध्ये करेल.

जवळपास 400 बसमध्ये सीएनजी गॅसचा वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून शहरातील 300 ते 400 बस चालवण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पातून सरकारला बाजार किमतीपेक्षा पाच रुपये कमी किमतीत सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे. यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल वाचणार आहे तसेच शेतकर्‍यांसाठी जैविक खताची निर्मितीही होणार आहे.

See also  उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी प्रकरणाबाबत आशिष मिश्राला 3 दिवसाची पोलीस कोठडी