बॅडमिंटन स्टार तसनीम मीर हीने वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वविजेती बनण्याचा केला विक्रम

0

गुजरात :

भारतीय युवा बॅडमिंटन स्टार तसनीम मीर हीने वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वविजेती बनण्याचा विक्रम केला आहे. तर सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधूला जे शक्य झाले नाही, असा विक्रम तसनीम मीर हीने केला आहे.

मात्र इतर खेळाडूंप्रमाणे माध्यमांनी बॅडमिंटन स्टार तसनीम मीरकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

तसनीम मीरची कामगिरी आणि तिचा प्रवास

गुजरातमधील मेहसाणा येथील 16 वर्षीय बॅडमिंटन स्टार तसनीम मीरने ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधूने आतापर्यंत जे केले नाही ते केले आहे. तसनीम ही कनिष्ठ श्रेणीची शटलर आहे. 19 वर्षांखालील महिला एकेरीत ती जगातील नंबर-1 खेळाडू बनली आहे. ज्युनियर खेळाडू असताना, सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधूसह कोणत्याही भारतीय महिला शटलरने ही कामगिरी केली नाही. ही कामगिरी करणारी तसनीम ही भारतातील पहिली ज्युनियर महिला खेळाडू ठरली आहे. 2011 मध्ये ज्युनियर जागतिक क्रमवारी सुरू झाली तेव्हा सायना पात्र नव्हती. तर सिंधू ही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे एकमेव स्वप्न

ही कामगिरी केल्यानंतर तस्नीम मीर म्हणाली, “मी खूप आनंदी आहे, पीव्ही सिंधू आणि सायना नेहवालप्रमाणे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील ऑलिम्पिकमध्ये वरिष्ठ स्तरावर भारतासाठी पदक जिंकण्याच्या ध्येयाने सराव करत राहीन.”

आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी खेळू दिलं नव्हतं

या स्टार खेळाडूने सांगितले की, एक काळ असा होता की आर्थिक अडचणींमुळे माझ्या वडिलांनी माझा खेळ थांबवला होता, मात्र प्रायोजक मिळाल्यानंतर माझा खेळ पुन्हा सुरू झाला आहे. तसनीमने गोपीचंद अकादमीत तीन वर्षे प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती गुवाहाटी येथील संस्थेत प्रशिक्षण घेत आहे. त्याचवेळी तसनीमच्या वडिलांनी सांगितले की, मुलीने वयाच्या सहाव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. तस्नीमने आतापर्यंत विविध प्रकारात 22 स्पर्धा जिंकल्या आहेत. एकेरीत ती दोनदा आशियाई चॅम्पियनही ठरली आहे.

See also  तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारताने न्यूझीलंडला दिला व्हाईटवॉश

भारतीय माध्यमांकडून मात्र दूर्लक्षित राहिली तसनीम

तसनीम मीरने १९ वर्षाखालील वयोगटात विश्वविजेतेपद मिळवत इतिहास रचला आहे. मात्र तिच्या कामगिरीला भारतीय माध्यमांनी एका छोट्या बातमीतच मर्यादित ठेवले आहे. ज्यु. जागतिक क्रमवारी मध्ये जरी तसनीम जगात पहिली आली असली तरी स्वतःच्याच देशात ती दुर्लक्षित राहिली आहे. आधीच क्रिकेटमुळे इतर खेळांना माध्यमांमध्ये नगण्यच स्थान आहे. पण त्यातही बॅडमिंटनमध्ये सायना किंवा पी,व्ही. सिंधू ने काही कामगिरी केली तर त्या माध्यमांमध्ये झळकतात. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या मालविका बनसोड ने सायना ला हरवल्यामुळे ती चर्चेत राहिली होती. परंतू तसनीम ची कामगिरी इतकी मोठी असूनही माध्यमांनी तिच्या या कामगिरी कडे कानाडोळा केला.