तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारताने न्यूझीलंडला दिला व्हाईटवॉश

0

कोलकाता :

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. प्रथम फलंदाजी करत भारताने 184 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंला केवळ 111 धावांपर्यंत मजल मारला आली. त्यामुळे भारताना हा सामना 73 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने मालिका खिशात घातली आहे.

185 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या दोन षटकात किवी संघाने 21 धावा जमवल्या होत्या. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने एकेका फलंदाजाला बाद करत सामन्यावर पकड निर्माण केली. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने एका बाजूने बराच वेळ संघर्ष केला खरा मात्र त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. गप्टिलने 36 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.

अक्सर पटेलने डॅरेल मिचेलला बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानेच दुसरी आणि तिसरी विकेट घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला. त्यानंतर इतर गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. अक्सर पटेलने 3 षटकात 9 धावा देत 3 बळी घेतले. तसेच हर्षल पटेलने 2 बळी घेतले. दीपक चाहर, वेंकटेश अय्यर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. तसेच इशान किशनने दोन फलंदाजांना धावबाद करत त्याच्यातील क्षेत्ररक्षणाचे उत्कृष्ट गुण दाखवले.

भारताचा पहिला डाव

कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याने आणि इशान किशनने योग्य ठरवला. या सलामीच्या जोडीने अवघ्या 6.2 षटकात 69 धावांची सलामी दिली. मधल्या षटकांमध्ये भारताची फलंदाजी ढेपाळली, मात्र हर्षल पटेल आणि दीपक चाहरने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी करुन भारताला 184 धावांपर्यत मजल मारुन दिली. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याने 3 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले. तसेच अॅडम मिल्ने, इश सोढी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

See also  शिखर धवन याने केल्या जलद दुसऱ्या क्रमांकाने ६००० धावा

सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला होता. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये 69 धावा कुटल्या. 6 व्या षटकात या जोडीने 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा फटकावल्या. सातव्या षटकात किशन 29 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव (0) आणि ऋषभ पंत (4) झटपट बाद झाले. दरम्यान, रोहितने जोरदार फटकेबाजी करत 27 चेंडूत अर्धशतक फटकावलं. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार लगावत त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर रोहित 56 धावा करुन रोहित माघारी परतला. इश सोढीने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत रोहितला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यरने भारताचा डाव सावरला, मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. श्रेयस 25 आणि वेंकटेश 20 धावा करुन माघारी परतले. अखेरच्या षटकांमध्ये हर्षल पटेल (18) आणि दीपक चाहरने (21) जोरदार फटकेबाजी करत भारताला 180 चा टप्पा पार करुन दिला.

https://twitter.com/BCCI/status/1462468039996153857?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1462468039996153857%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F