बाणेर :
बाणेर येथील अपहरण झालेल्या मुलगा स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेड वरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्या चा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
सौ. सुनीता संतोष राठोड चव्हाण वय 36 यांचा अपघातामध्ये नगर महामार्गावर चार चाकी अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची दोन मुले व पती गंभीर जखमी झाले आहेत. एक मुलगा जुपिटर हॉस्पिटल ला उपचार घेत असून दुसरा प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे.
समर राठोड वय 14 अमन राठोड वय ६ अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहे. तर त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. एक मुलगा जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दुसरा मुलगा प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे.
कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.