दुकांनावरील नावाच्या पाट्या या मराठीतच असाव्या यासाठी राज्यसरकारचा कडक निर्णय

0

मुंबई :

राज्यात मराठी वाढवा ही मोहीम सुरू असतांनाच राज्य सरकारने या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला.काही दिवसांपूर्वी सर्व दुकांनावरील नावाच्या पाट्या या मराठीतच असाव्या या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला होता.

परंतू हा निर्णय अनेकांनी गांभिर्याने घेतला नव्हता. परंतू सरकारने आता या संदर्भात कडक निर्णय घेतला आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017’ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही केली होती. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या.

त्या संदर्भात राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधीतांची बैठक घेऊन कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने न आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.

दुकानांच्या पाट्याची नावे अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात तर मराठीत लहान अक्षरात असायची. त्यामुळे आज मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयात मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. तसेच मराठी – देवनागरी लिपितील अक्षरे अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती सुध्दा मंजूर करण्यात आली.

See also  राज्यात जमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी विक्री करण्यावर सरकारची बंधने