सचिन दळवी यांच्या ‘दिनदर्शिका-2022’ चे प्रकाशन

0

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांनसाठी भाजपा युवा नेते सचिन दळवी यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘दिनदर्शिका-2022’ चा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या दिनदर्शिकेची माहिती देताना भाजपा युवा नेते सचिन दळवी म्हणाले की, दिनदर्शिका आपल्या दैनंदिन जीवनाला वेगळी दिशा देत असते. तिला आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे.आवश्यक असणार्‍या माहितीची पूर्तता करणारी दिनदर्शिका परिसरातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रकाशन करण्यात येत आहे. ही दिनदर्शिका नागरिकांना उपयोगी पडावी म्हणून सगळ्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.

दिनदर्शिकेचे प्रकाशन करतेवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, समाजातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन सचिन दळवी यांनी बनवलेली दिनदर्शिका फार उत्तम आहे. ही दिनदर्शिका दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांच्या उपयोगी पडेल. दिनदर्शिका तयार करताना दळवी यांनी केलेला सामाजिक कामाचा आराखडा यामध्ये मांडून तो नागरिकांन समजेल अशा पद्धतीने त्याची मांडणी केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन सचिन दळवी यांनी समाज उपयोगी केलेल्या कामाचा आढावा असलेली दिनदर्शिका नागरिकांना परिपूर्ण माहिती पुरविणार आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन सचिन दळवी नेहमीच समाजोपयोगी कामासाठी अग्रेसर राहतात. अशीच कामे त्यांनी नेहमी करावे असे प्रतिपादन महापौर मुरलीधर यांनी यावेळी केले.

या प्रसंगी राहुल कोकाटे, स्विकृत सदस्य शिवम सुतार, महेश पवळे, उत्तम जाधव, आदी उपस्थित होते.

See also  अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी संकलनाचा बाणेर बालेवाडी इथे शुभारंभ.