2013 पासून टीईटी मार्फत भरती झालेल्या शिक्षकांची होणार पडताळणी

0

पुणे :

2013 पासून टीईटी मार्फत भरती झालेल्या राज्यातील 1 ते 8 वी पर्यंतच्या शिक्षकांची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगपरिषदांना तसे आदेश देण्यात आले आहे. याबाबत येत्या तीन चार दिवसांत माहिती प्राप्त होईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.

2013 पासून रुजू होणाऱ्या शिक्षकांची होणार पडताळणी

राज्यात 2018 ते 2020 या दरम्यान झालेल्या टीईटी शिक्षक पात्रता घोटाळ्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. मात्र, टीईटी परिक्षेत 2013 पासूनच हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे 2013 पासून रुजू झालेल्या सगळ्याच शिक्षकांची पात्रता तपासणी करायचे शिक्षण परिषदेने ठरवले आहे. मात्र, 2018 आणि 2020 मधील गैरव्यवहारात ज्यांची नावे उघड झाली आहे. त्याबद्दल अद्याप कोणतीही कारवाई परीक्षा परिषदेकडून होताना दिसत नाही.

तीन ते चार दिवसांत मिळणार माहिती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप प्रसारमाध्यमांशी बोलताना 2013 ते 2020 पर्यंतची माहिती मिळण्यास वेळ लागत असल्याने, येत्या तीन ते चार दिवसांत ती मिळेल. त्याचसोबत, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून नेमणूक झालेले सर्व शिक्षकांची पडताळणी होईल. त्यानंतर पडताळणी करुन हा अहवाल राज्य परीक्षा परिषदेला देण्यात येणार असल्याचे जगताप ( MSSHSB President Dattatray Jagtap ) म्हणाले.

See also  पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील.