योग्य नियोजनबद्ध कामामुळे योगीराज पतसंस्थेला नफा : ज्ञानेश्वर तापकीर

0

औंध :

पतसंस्थेच्या यशामध्ये संस्थेच्या स्टाफ चा फार मोठा वाटा आहे. संस्थेचे संचालक मंडळ जबाबदारीनं आपली काम निभावतात म्हणून संस्था मोठी होत आहे. संस्थेने या वर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर देखील १ कोटी ९० लाखाचा नफा कमावला ते योग्य नियोजनबद्ध काम केल्यामुळे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी व्यक्त केले.

योगीराज पतसंस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त साधून सरकारी नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी उपमहापौर शंकरराव निम्हण, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीप मुरकुटे, ह.भ.प.संजयबापू बालवडकर, यशस्वी हॉटेल उद्योजक रामदास मुरकुटे, संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, उपाध्यक्षा अलका सिरसगे, संचालक राजेश विधाते, वसंत माळी, अॅड. अशोक रानवडे, संजय बालवडकर, अमर लोंढे, गणेश तापकीर, हितेश तापकीर, डॉ. सागर बालवडकर, प्रशांत बहिरगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सिमा डोके व सर्व स्टाफ उपस्थित होता.

पुढे बोलताना तापकीर म्हणाले की, संस्थेच्या स्टाफ ने स्वतः ठेवी ठेवल्यामुळे एक वेगळी विश्वासार्हता संस्थेबाबत निर्माण झाली आहे. केवळ दोनशाखेत संस्थेने नियोजनबद्ध प्रगती साधली आहे. संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा वारकरी सांप्रदायिक वातावरणात करण्याचा प्रयत्न योगीराज पतसंस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रवींद्र घाटे यांनी सांगीतले की, योगिराज पतसंस्था उत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. योगीराज पतसंस्था आहे एक प्रकारचा विद्यापीठ असून संस्थेने संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य लोक तयार केले आहेत.

बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे योगीराज पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांचा सन्मान केला. व पतसंस्थेने केलेल्या यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.

तसेच वर्षभरात संस्थेचा स्टाफ श्रद्धा येडवे, संध्या यादव व नम्रता मेढेकर यांनी मोठ्या प्रमाणात संस्थेत वैयक्तिक ठेवी ठेवल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक राजेश विधाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर दत्तात्रय गंगणे यांनी आभार मानले.

See also  पुणे जिल्ह्यात आणि पुणे महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात