संकटग्रस्त बालकांसाठी 1098 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत

0

दिल्ली :

कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीकरिता चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे.

भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24×7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकते किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात.

1098 या टोल फ्री क्रमांकावरवर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

See also  वोडाफोन-आयडिया संदर्भातील बातम्यांने ग्राहक आणि गुंतवणूकदार धास्तावले.