मॉडर्न महाविद्यालयात रियान इनोव्हेट-ए-थॉनचे आयोजन‌

0

पुणे :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात रिकायन टेक्नॉलॉजी प्रा.लि.व मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स यांच्या कम्पुटर सायन्स विभाग संयुक्त विद्यमाने मॉडर्न कॉलेज, येथे रियान इनोव्हेट-ए-थॉनचे आयोजन‌ ला करण्यात आले.

हॅकाथॉनचा उद्देश ऑडिओ आणि आर्टीफिशीयल ईंटीलीजीयन्सचा वापर करुन व्हिडीओमध्ये नवकल्पना साकारणे,भाषा आणि संस्कृतीची नाळ टेक्नाॅलाॅजीशी जोडणे हा होता. या कार्यक्रमाची सुरुवात सत्कार समारंभाने झाली. प्राचार्य डाॅ खरात यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितले की रियान कंपनीसारखा ईंडस्ट्री पार्टनर मुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळतील. यापुढेही महाविद्यालय असे अनेक प्लॅटफाॅर्म विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देईल.

त्यानंतर सहभागींना व्हिडिओ लोकैलायझेशनवर केंद्रित असलेल्या आव्हानात्मक समस्या,आर्टीफिशीयल ईंटीलीजीयन्सची ओळख करून देण्यात आली, व सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण विकसित कल्पना साकारण्यासाठी प्रोत्साहित केले गेले.

या कार्यक्रमात निशांत जाधव, पवन अगरवाल, CEO, रवीकांत रसाळ, मोईन पठाण, लीड सॉफ्ट इंजिनिअर एफटीपी प्रोजेक्ट लीड व. साईजश पडीचाराईल लीड सॉफ्ट इंजिनिअर यांनी रियान कंपनी तर्फे पॅनेल मेंबर म्हणून काम केले. कार्यक्रमात पॅनेल सदस्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. मार्गदर्शक चर्चा केली, आणि अभिप्राय दिले.

नाविन्यपूर्ण विचार आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनांना आणखी प्रेरणा देण्यासाठी मदत केली. या दिवसात स्टार्टअप्स, उद्योजकता आणि नावीन्यता उद्योगातील प्रमुख व्यक्तींनी सध्याच्या टेक इकोसिस्टममध्ये व्यवसाय उभारण्याबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केले .

विशेष सहभाग सुयोग पत्की, रॅपिड सर्कल, अमोल धोंडसे, मुख्य आर्किटेक, आय बी एम , नितीन दबाडघाव सह संपादक बाईटस आरोना यांनी कार्यक्रमात विशेष सहभाग घेतला.

स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने झाला, ज्यामध्ये सहभागींच्या सर्जनशीलतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. अद्वैत टेकर संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख,  आर्यन तिवारी, मार्केटींग एक्झुक्विटिव्ह, निवासन आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम पारितोषिक अथर्व फंडे टी वाय बी एस्सी माॅडर्न महाविद्यालय याला तर द्वितीय पारितोषिक मुबशीर सलीम, एस वाय बी एस्सी, क्राईस्ट विद्यापीठ यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले. सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र आणि त्यांना ‘ ॲटॉमिक हॅबिट्स’ या पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आली.

See also  पुणे शहरात शिथिलता देण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य मंत्र्यांना दिला प्रस्ताव.

काही उत्कृष्ट उमेदवारांना इंटर्नशिपची संधी देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी रियानचे सीईओ आनंदसागर शिराळकर यांनी प्रेरणादायी संदेश दिला. प्राचार्य संजय खरात यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. डाॅ शुभांगी भातांब्रेकर यांनी सहकार्य केले.  डाॅ सतीश अंबिके यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम शक्य झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैत नाटेकर आणि आर्यन तिवारी यांनी केले. प्रा. सुरेश तोडकर, सहकार्यवाह पी ई सोसायटी व डॉ. प्रकाश दीक्षित, उपकार्यवाह पी ई सोसायटी यांनी अभिनंदन केले.