पुणे बार असोसिएशन गणेशोत्सव  सोहळ्यात पुण्यातील ऐतिहासिक वास्तू व उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा देदीप्यमान असा देखावा..

0

शिवाजीनगर :

पुणे बार असोसिएशन तर्फे जिल्हा न्यायालय येथे अशोका हॉल च्या प्रांगणात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून यावर्षी प्रथमच शनिवार वाडा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महात्मा फुले मंडई, पाताळेश्वर लेणी यांसारख्या पुण्यातील ऐतिहासिक वास्तू व उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा देदीप्यमान असा देखावा सादर केला आहे.

या देखाव्यातून पुण्यात खंडपीठ व्हावे याची मागणी चा संदेश देण्यात आलेला आहे. आजवर पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश  मा संजय देशमुख तसेच सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुके साहेब या मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली असून येत्या काळात अनेक मान्यवर सदर देखाव्यास भेट देणार आहेत.

पुण्याला मोठा इतिहास असून या शहरात अनेक वास्तू आज इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पुणे तिथे काय उणे असे आपण म्हणतो तर या पुण्यात या उणे असेल तर ते उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे उणे असून लवकरच ती उणीव भरून निघावी व पुण्यात खंडपीठ व्हावे यासाठी बाप्पा ला साकडे घातले आहे. तसेच सर्व वकील, न्यायाधीश, कर्मचारी वर्ग तसेच पक्षकार या सर्वांचे आरोग्य चांगले राहावे व भरभराट व्हावी हीच प्रार्थना आहे असे
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंगजी थोरवे यांनी याप्रसंगी सांगितले.

पुणे बार असोसिएशन तर्फे गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त सर्वांसाठी ‘सेल्फी विथ श्री गणेशा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे बार असोसिएशन च्या बाप्पा सोबत स्वतः चा सेल्फी काढून 7028665712 या व्हाट्सएप क्रमांकावर दिनांक ०६/०९/२०२२ रोजी सायंकाळी ४ वा. पर्यंत स्वतः चे नाव व पत्ता लिहून पाठवायचा आहे. सदर सर्व सेल्फीमधून लकी ड्रॉ द्वारे पाच सेल्फी ची निवड बक्षिसांसाठी केली जाणार आहे.

याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव येळे पाटील, सचिव ॲड. अमोल शितोळे, सचिव ॲड. सुरेखा भोसले खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ॲड. सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले,  ॲड. अमोल दुरकर ॲड. कुणाल अहिर, ॲड. तेजस दंडागव्हाळ,ॲड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने वकील व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

See also  औंध येथील मनिष रानवडे यांची पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.