उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन.

0

पालघर :

उद्योगपती सायरस मिस्त्री (५४) यांचे पालघर नजीक झालेल्या अपघातात निधन झाले आहे. या वृत्ताला पालघर जिल्हा अधीक्षकांनी दुजोरा दिला आहे. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पल्लोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या प्रमुखपदाची सूत्रे सांभाळली होती.

पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सायरस एमएच 47 एबी 6705 या क्रमांकाच्या मर्सिडीज कारने ते अहमदाबाद येथून मुंबईकडे येत होते. दरम्यान चारोटी येथे रस्ते दुभाजकावर आदळली आणि सदर अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सूर्या नदीच्या पुलावर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात सायरस आणि त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोण होते सायरस

सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुटुंबात झाला. उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे ते धाकटे सुपूत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. लंडनच्या इंपीरियल कॉलेज त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण झाले. २००६ साली ते टाटा समुहाचे सदस्य बनले. २०१३ साली वयाच्या ४३ व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. परंतु, २०१६ साली वादानंतर मिस्त्री यांना टाटाच्या अध्यक्षपदावरून हटवलं.

नुकसानीमध्ये असलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये भागिदारी विकल्याचा मिस्त्रींवर आरोप होता. यानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. सायरस मिस्त्री आणि टाटा समुहामधील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. सायरस मिस्त्री यांनीं शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर पद देखील भूषवले होते. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील मृतांसह जखमींना टाटा समुहाकडून मोठी मदत करण्यात आली होती. ही मदत मिळवून देण्यात सारयस यांचा मोठा वाटा होता.

पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.

See also  आरगॉन आणि नायट्रोजन वाहून नेणाऱ्या टँकरचे रुपांतर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये : राज्यसरकार