औंध येथील मनिष रानवडे यांची पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

0

औंध :

पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी औंध येथील मनीष रानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड असणाऱ्या व संपूर्ण औंध गावात एक चांगला क्रिकेट खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनिष रानवडे यांच्या निवडीने औंध परिसरातील सर्वच स्थरावरील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.

निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना मनिष रानवडे म्हणाले की, पुणे जिल्हा किकेट असोसिएशनच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बिनविरोध निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. येणाऱ्या पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन पुणे जिल्ह्यात चांगले क्रिकेट खेळाडू घडतील या साठी प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त गुणी खेळाडूंना कशाप्रकारे वाव देता येईल या कडे विशेष लक्ष दिले जाईल.

पुणे जिल्हा किकेट असोसिएशनची निवडणूक दिनांक ०१ में २०२२ रोजी पार पड़ली, या निवडणुकीतून १० सदस्य बिनविरोध व ०३ सदस्य निवडणरकीदवारे निवइ़न आले, निवड़न आलेल्या १३ सदस्यांमधून खालील पदाधिकान्यांची कार्यकारिणीमधुन व विशेष सर्वसाधारण सभेमधून बिनविरोध निवड झाली.

सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी खालीलप्रमाणे –
१. अध्यक्ष – मनिष अनंत रानवडे
२. चेअरमन – विवेक आनंद डफळ
३. व्हाईस चैअरमन – जयंत विद्वलराव भोसले
४. सहसचिव – सुशील शिवाजी शेवाळे
५. सहसचिव – सुहास शंकर आगलाबे
६. उपाध्यक्ष – रमेश दत्तात्रय बैंडे
७. उपाध्यक्ष – लहू हरी पाटील
८ उपाध्यक्ष – रमेश नानासाहेब तिकोने
९. खजिनदार – जुझर हसेन पुनावाला
कार्यकारिणी सदस्य
१০. इम्तलियाज महंमदहसेन द्फेदार
११. उदय सुभाष बाळ
१२. दिलीप बाबूराव झडे
१३. यशवत शिवराम भुजबळ
स्विकृत सदस्य –
१४. कैलास बबनराव येवले
१५. सतिश चंद्रकांत अकोलकर
१६. आलोक नागराज

See also  औंध मधील पार्किंग सुविधेची गरज लक्षात घेता प्राधान्याने काम केले: चंद्रकांत पाटील