औंध बालेवाडी मधिल प्रत्येक घरासाठी सचिन मानवतकर यांच्या वतीने आरती संग्रह भेट.

0

औंध :

गणपती बाप्पाच्या प्रस्थापनेनंतर प्रभाग क्रमांक 12 औंध बालेवाडी मधिल प्रत्येक घरासाठी भाजपा युवा नेते सचिन मानवतकर यांच्या वतीने गणपती बाप्पाच्या आरती संग्रहाचे प्रकाशन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, भाजपा शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रविंद्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बागडे यांच्या उपस्थित संपन्न झाला.

याची माहिती देताना भाजपा युवा नेते सचिन मानवतकर यांनी सांगितले की, गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे उत्साह संचारला आहे. घरोघरी सकाळ संध्याकाळ आपल्याकडे बाप्पाची आरती लहानापासून मोठया पर्यन्त सर्वच म्हणत असतात. म्हणूनच प्रत्येक घरात आरती संग्रहाचे वाटप करावे असा संकल्प मनात होता. तो पुर्ण करताना मनाला आनंद होत आहे.

प्रभागातील घरोघरी हा आरती संग्रह पोचविण्याचा प्रयत्न माझा असेल. सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आहे. असे सचिन मानवतकर यांनी सांगितले.

See also  औंध-बालेवाडी सर्वाधिक मतदार असलेला मतदार प्रभाग