शहरातील टोल रद्द केला जाईल, नितीन गडकरी यांची घोषणा.

0

नवी दिल्ली :

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाचं आता मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत शहरातील टोल रद्द केला जाईल या निर्णयाची घोषणा केलेली आहे.

राज्यसभेत नितीन गडकरी म्हणाले आहेत की, आम्ही 1990 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री असताना त्या तत्त्वावर महामार्ग बांधले. तसेच आता आपण नवी पद्धत आणत आहोत. त्यामुळं शहरी भागातील लोकांना टोल भरण्यातून वगळलं जाईल कारण 10 किलोमीटरच्या रस्त्याचा वापर करण्यासाठी 75 किलोमीटर रस्त्याचा टोल शहरातील लोकांना भरावा लागत आहे.

याचसोबत पुढे बोलताना ते म्हणालेत की, या टोलचा ‘फादर ऑफ टोल टॅक्स’ मीच असून देशात बीओटीचा सगळ्यात पहिला प्रकल्प ठाणे भिवंडी या दरम्यान मीच राबवला होता. मात्र शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून एक नवीन पद्धत सुरू करणार आहोत.

येत्या काळात रस्त्यावर कोणतेही टोल लेन नसतील तर त्याऐवजी टोल वसूल करण्यासाठी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टम तयार केली जाणार असून याद्वारे तुम्ही टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाणार आहे.

दरम्यान, रोडमध्येच असलेले सर्व टोल हटवण्यात येणार असून टोलऐवजी नॅशनल हायवेवर दर 60 किमीच्या अंतरावर एक टोल प्लाझा करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना कोणत्याची ठिकाणी टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाही. यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचण्यास मदत होईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी मार्च 2022 मध्ये दिली होती.

See also  नासाच्या शास्त्रज्ञांना इतिहासातील सर्वात मोठे यश सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याचा केला विक्रम