कॉमनवेल्थ पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरने जिंकले सुवर्ण पदक

0

कॉमनवेल्थ :

कॉमनवेल्थ पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरनं दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकलंय.

सुधीरनं पुरुषांच्या हेवीवेटमध्ये 134.5 गुण प्राप्त केले. याशिवाय त्यानं नवा विक्रमही प्रस्थापित केलाय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताचं हे सहावं सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण वीस पदक जिंकली आहेत. कॉमनवेल्थ 2022 च्या पदकतालिकेत भारत सातव्या क्रमांकावर आहे.

पुरूष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरनं एकतर्फी प्रदर्शन केलं. या स्पर्धेत सुधीर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढं होता. त्यानं पहिल्या प्रयत्नात 208 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 212 किलो वजन उचललं. सुधीरचं वजन 87.30 आहे. ज्यामुळं त्याला 134.5 गुण मिळाले. या गुणांसह त्यानं नवा विक्रमही प्रस्थापित केलाय.

मोहम्मद अनीस याहियाचं थोडक्यात पदक हुकलं
भारतीय ऍथलेटिक्स मोहम्मद अनीस याहिया अंतिम फेरीत पदक जिंकू शकला नाही. तो 6 प्रयत्नांनंतर 7.97 च्या सर्वोत्तम प्रयत्नासह पाचव्या क्रमांकावर राहिला. याहियां पहिल्या तीन प्रयत्नांत 7.72 मीटरचा सर्वोत्तम प्रयत्न केला. मात्र, त्याचा पहिलाच प्रयत्न फाऊल ठरला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं 7.65 मीटर उडी मारली. त्यानंतर तिसर्‍यात प्रयत्नात 7.72 मीटर, चौथ्या प्रयत्नात 7.74 मीटर, पाचव्या प्रयत्नात 7.58 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 7.97 मीटर उडी मारली.

भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-

सुवर्णपदक- 6 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर)

रौप्यपदक- 7 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)

कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर.)

See also  भारतविरुद्ध इंग्लड अटीतटीच्या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.