रामसेतूला ला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी सर्वाच्च न्यायालयातील याचिकेवर लवकरच सुनावणी.

0

नवी दिल्ली :

गेल्या अनेक दिवसांपूर्वी तामिळनाडूत असणाऱ्या रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात भाजप नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केली होती. आता या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडणार आहे.

येत्या 26 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.

रामसेतुला राष्ट्रीय स्मारक घोषित करा ही मागणी एक राजकिय मुद्दा बनली आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात सेतू समुद्रम प्रकल्प योजना सुरू करण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, तेव्हा माल वाहणाऱ्या जहाजांसाठी वाहतुकीचा मार्ग बनवण्यात येणार होता. यासाठी रामसेतू तोडण्याचा विचार केला गेला होता. मात्र कोर्टाने दिलेल्या या आदेशानंतर ही कारवाई थांबवण्यात आली.

यानंतर रामसेतू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा अशी मागणी करण्यात आली. तेव्हापासून ते आजवर रामसेतू हा एक वादाचा मुद्दा बनून राहिला आहे. दरम्यान हा सेतू तामिळनाडू येथील रामेश्वरम आणि श्रीलंकेतील मन्नार दरम्यान चुनखडकांपासून तयार झालेला आहे. हिंदूंच्या मान्यतेनुसार, या सेतुला श्रीराम यांच्या वानर सेनेने तयार केले होते. या सेतूच्या आधारे श्रीराम यांनी श्रीलंकेत प्रवेश केला होता.

See also  टाटा कंपनीने एअर इंडिया ताब्यात घेतल्याने विमानात चांगले बदल होण्यास सुरुवात : पी. चिदंबरम