बाणेर टेकडी सह पुण्यातील सर्व टेकड्यांवर श्र्वानाना बंदी !

0

पुणे :

पुण्यातील टेकड्यांवर सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. फिरायला येताना नागरिक आपले पाळीव श्वान घेऊन येत असतात. मात्र, काही पाळीव श्वानांच्या गळ्यात पट्टे नसल्याने हे श्वान फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच या श्वानांमुळे वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारावर मर्यादा येऊ लागली आहे. त्यामुळे राखीव वनक्षेत्रांमध्ये पाळीव प्राण्यांना फिरवण्यावर वन विभागाने बंदी घातली आहे. हा आदेश पुणे शहरातील सर्व टेकड्याबाबत लागू आहे.

श्वानांच्या नैसर्गिक विधीसाठी टेकडीवर फिरायला घेऊन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे टेकडीवरील गवतामध्ये अनेकदा घाण पडलेली असते. टेकडीवर श्वानांना फिरायला घेऊन येणाऱ्यांचे ग्रुप तयार झाले आहेत. यामुळे वैतागलेल्या नागरिकांना मागील काही वर्षापासून वन विभागाकडे तक्रारी करत पाठपुरावा केला आहे. वर्षभरापूर्वी तळजाई टेकडीवर वन विभागाने पाळीव प्राण्यांना टेकडीवर फिरण्यास आणू नये असा फलक लावला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत नागरिक सर्रासपणे आपले पाळीव प्राणी टेकडीवर फिरण्यासाठी घेऊन जातात.

त्यामुळे वन विभागाने आता शहरातील वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, लॉ कॉलेज, बाणेर टेकडी, बावधन, पर्वतीसह सर्वच टेकड्यांवर पाळीव प्राण्यांना प्रवेश बंद केला आहे. तसेच टेकड्यांच्या प्रवेशद्वाराव तसे फलक लावण्यात येत आहेत. राज्य वन नियम 2014 तील नियमानुसार राखीव वनक्षेत्रामध्ये पाळीव प्राणी आणि कुत्र्यांना बंदी आहे. या प्राण्यांमुळे वन्यप्राण्यांच्या फिरण्यावर मर्यादा येऊन त्यांना असुरक्षित वाटते. तसेच श्वानांकडून वन्य प्राण्यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. पुण्यातील टेकड्यांवर वन्यप्राण्यांचा वावर असून पाळीव श्वानांमुळे त्यांच्यामध्ये रोगराई पसरण्याची भीती आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन वन विभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बाणेर पाषाण टेकडीवर वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्ष संवर्धन केले जाते. त्या साठी ठीक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधलेले आहेत. या टेकडी वरती बहुसंख्य प्रमाणात लहान मुलान साेबत असंख्य नागरिक व्यायामासाठी येतात. परंतु गेल्या काही वर्षापासून बरेच लोक पाळीव श्र्वान घेऊन येतात.

See also  पुण्यात आता हरणांची सहल !

यावर प्रतिक्रिया देताना वसुंधरा अभियान चे भुजबळ सर यांनी सांगीतले की, टेकड्यांवर पाळीव श्वान घेवुन येण्यास बंदी असणार नियम जुनाच आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे ही चांगली बाब आहे. टेकडीवर हे श्वान फिरायला येणाऱ्या माणसांवर धावून जातात चावतात त्यामुळे श्वान मालक आणि नागरीक यामध्ये वाद होतात. शिवाय हे श्वान मालक वृक्ष रोपांसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाक्या मध्ये श्वान धुतात त्यामुळें वसुंधरा अभियान मार्फत श्रमदान करणाऱ्या सभासदांना त्रास होतो.