पुण्यात आता हरणांची सहल !

0
slider_4552

पुणे :

पुणे शहर आणि परिसरात वन्य प्राण्यांचे दर्शन होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरात मानवी वस्तीत एक गवा आढळून आला होता. आता चक्क हरणांचा कळप पाहालया मिळाला आहे. होय, पुणे शहरापासून काही अंतरावर असलेला शिवणे परिसरातील आशीर्वाद सोसायटी आवारात हा कळप दिसला. येरवी हरीण पाहण्यासाठी जंगलात जावे लागते. परंतू, पुणेकरांना थेट आपल्या सोसायटीतच हरीणांचा कळप पाहायला मिळाला.

पुणे शहरात असलेल्या एनडीए लगत जंगल परिसर आहे. या परिसरात विविध वन्य प्राणी आढळतात. याच परिसराला लागून शिवणे येथील आशीर्वाद सोसायटी आहे. सोसायटीच्या लगत असलेली एनडीए कुंपणाची भिंत काही कारणामुळे कोसळली आहे. ती तशीच पडून आहे. त्यामुळे या कुंपणाच्या पडलेल्या भिंतीतून हरणांनी सोसायटी आवारात प्रवेश केला.

प्राप्त माहितीनुसार वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या आधी गव्यासोबत घडलेला प्रकार ताजा असल्याने हरणांसोबत असा अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभाग कार्यरत झाला. पुणे शहरात या आधी एका पाठोपाठ एक असे दोन वेळा गव्याचे दर्शन झाले आहे. पहिल्यांदा गवा दिसला तेव्हा नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे गवा बिथरला. परिणामी तो नागरी वस्तीत सैरावैरा धावू लागला. यात गवा मोठ्या प्रमाणावर जखमी झाला. वन विभागाने त्याला पकडेपर्यंत त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्त गेले होते. रक्तदाब वाढल्याने अखेर गव्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या वेळी गवा दिसल्यानंतर मात्र प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन त्याची सुटका केली.

‘एनडीए’ परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आहे. सोसायटीमध्ये आलेली हरणे ‘एनडीए’च्या पडलेल्या संरक्षक भिंतीच्या मार्गाने आली. या संदर्भात आमचे ‘एनडीए’च्या अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे. ही भिंत लवकर बांधण्याबद्दल आम्ही त्यांना पत्र पाठवणार आहोत. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी हरणांना खाद्य देऊ नये, तसेच त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना आम्ही दिल्या आहेत.

– दीपक पवार, वन परीक्षेत्र अधिकारी, वन विभाग

See also  एकपात्री नाट्य कलावंतांना मदत म्हणून अन्न धान्य किट वाटप : मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण निमित्त प्रकाश बालवडकर यांनी कोथरूड मध्ये घेतला उपक्रम!