पंढरपूरला पायीवारी साठी निघालेल्या दिंड्याना शिवम सुतार यांच्यावतीने औषधाच्या पेट्या भेट..

0

सुतारवाडी :

प्रभाग क्रमांक १४ सुतारवाडी, पाषाण, बावधन सोमेश्वरवाडी आणि जवळ पासच्या इतर परिसरातील पंढरपूरला पायीवारी साठी निघालेल्या दिंड्याना माजी स्विकृत सदस्य शिवम आबासाहेब सुतार यांच्या वतीने वारकऱ्यांचे आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणुन औषधाच्या पेट्या भेट देण्यात आल्या.

याबद्दल माहिती देताना स्विकृत सदस्य शिवम सुतार यांनी सांगीतले की, सांप्रदायिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आपल्या समाजात पंढरपूरच्या वारीला अधिक महत्व आहे. आपल्या परिसरातील शेकडो नागरिक पायी वारी साठी वेगवेगळ्या दिंडी मध्ये सामील होवून जात असतात. या प्रवास सुखाचा आणि निरोगी व्हावा म्हणून सुतारवाडी, पाषाण,बावधन, सोमेश्वरवाडी आणि परिसरातील सर्व दिंडीना सुसज्ज औषध पेटया देण्यात आल्या. “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” असून समस्त वारकऱ्यांची वारी उत्तम आरोग्य राखत पूर्ण व्हावी सर्व दींड्याना सुसज्ज औषध पेटी उपलब्ध करून दिली आहे.

शिवम आबासाहेब सुतार यांच्या वतीने पुढील दिंड्याना सुसज्ज औषध पेटी देण्यात आली.

१. समस्त सुतारवाडी दिंडी क्र 6 रथा पुढे

२. ह भ प मुक्ताबाई बेलगावकर दिंडी (पंढरपुर,बावधन,सुस दिंडी क्र 59)

३. वै.ह भ प बाळोबा सुतार पाषाणकर(सुतारवाडी,पाषाण, सोमेश्वरवाडी दिंडी क्र 33)
४.नांदेडकर दिंडी बावधन क्र. १५

५. निकम दिंडी पाषाण पुणे दिंडी क्र. १६

See also  बाणेर सकाळ नगर परिसरात घरफोडी.