बालेवाडी :
दरवर्षीप्रमाणे संजय बाजीराव बालवडकर (अध्यक्ष विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्ट बालेवाडी) व अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने बालेवाडी ते पंढरपुर मोफत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा यात्रेचे २८ वे वर्ष असुन ज्ञानोबा-माऊलींच्या मोठ्या जयघोषात या यात्रेची सुरुवात करण्यात आली.
पंढरपूर यात्रेची माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मॅकन्यूज शी बोलताना सांगितले की, दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने परिसरातील नागरीकांना पंढरीत जाऊन विठुरायाचे दर्शन घडावे या उद्देशाने या परिसरातील शेकडो भाविक या एकदिवसीय यात्रेत सहभागी होत असतात. यात्रेदरम्यान सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखिल यावेळी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्षांनी भाविकांना पंढरीत जाऊन विठुरायाचे चरणस्पर्श करुन दर्शन घेता आले याबद्दल सर्व भाविकांनी अतिशय आनंद व समाधान व्यक्त केले. आपला परिसर बहुतांशी नागरिक सांप्रदायिक क्षेत्रात असुन त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडविल्याने त्यांच्या चेहऱ्यावर ती निर्माण होणारे आनंदी भाव पाहून मनाला समाधान लाभते.
यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत संजय बा.बालवडकर(अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट बालेवाडी), सौ.आशाताई बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, मा.नगरसेवक सनी निम्हण, युवा नेते लहुशेठ बालवडकर, बाळासाहेब रानवडे, नारायण चांदेरे, नितिन रनवरे, अस्मिता करंदिकर, अनिलबाप्पु ससार, अनिल बालवडकर, शशिकांत बालवडकर, सचिन मानवतकर, सुभाष भोळ, बालेवाडी भजनी मंडळ व बालेवाडी-औंध-बाणेर-सुस-म्हाळुंगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.