बाणेर :-
बाणेर रोड वरील सकाळ नगर परिसरात घरफोडीची घटना घडली आहे. त्या मध्ये 3 लाख 40 हजारचा मुद्देमाल चोरीला गेला असून चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सकाळ नगर येथील फ्लॅट नं.२ , बिल्डींग नं.१८ – सी, सकाळनगर, पुणे कौस्तुभ दास, वय -३७ यांचा फ्लॅट आहे.
१३ ते १९ डिसेंबरला ते फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटुन, त्यावाटे आंत प्रवेश करून, बेडरूम मधील कपाटातील १० हजार रुपये कॅनॉन कंपनीचा कॅमेरा व सोन्याचे दागिने असा एकुण ३ लाख ४० हजार रूपये किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून चोरून नेला. दास हे घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चतुःश्रृंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक, महेश भोसले करत आहेत.