“ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध: वाणिज्य विभाग, मॉडर्न गणेशखिंड”

0

गणेशखिंड :

गणेशखिंड येथिल प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे ग्रामीण बँकिंग साक्षरता अभियानाबाबत विद्यार्थी स्वयंसेवकांशी मा. विद्याधर अनास्कर, आध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद यांनी संवाद साधला.

प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी मान्यवरांचे स्वागत केले ते बोलताना म्हणाले शिक्षणातुन समाज घडविण्याचा उपक्रम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या ६२ संस्थेमधुन चालतो.

वाणिज्य शाखा व फ्युचर बँकिंग फोरम याबाबद्दल प्रा. विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या बँकेच्या विविध योजना विद्यार्थ्यांनी असंघटित लोकांपर्यंत पोहोचवली. बँक आँफ महाराष्ट्र मधे विद्यार्थ्यांनी आजादी का अमृत महोत्सवामधे जाऊन काम केले व सर्वांना बँकेच्या विविध सवलती समजावून दिल्या.”

पाहुण्यांचा सत्कार पी ई सोसायटीचे उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांच्या हस्ते पार पडला.

प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्ष माननीय श्री. विद्याधर अनास्कर म्हणाले,” विषयाचा पाया जर पक्का असेल तर तुम्ही प्रत्येक क्षॆञात उंच भरारी घेऊ शकता. बँकिग हा जगण्याचा मार्ग आहे. आजही जवळ जवळ ५०% लोकांना बँकिंगची सवय नाही. म्हणून बँकिग साक्षरतेची गरज आहे. आज हे विद्यार्थी अतिशय चांगले काम करत आहेत यासाठी या महाविद्यालयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे”

डाॅ प्रकाश दिक्षित म्हणाले,”विद्यार्थी बँकिगमधे खुप कौतुकास्पद कामगिरी करत आहेत.ग्रामीण साक्षरतेमुळे बँकिग क्षेम सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचेल व त्याला आमचे महाविद्यालयीन विद्यार्थी मदत करत आहेत हे अभिमानास्पद आहे.”

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्मार्ट बँकिंगवर पथनाट्य सादर केले. उपप्राचार्या डॉ. शुभांगी जोशी यांनी आभार प्रदर्शन केले .कार्यक्रमाचे समन्वय फ्युचर बँकिंगच्या प्रमुख प्रा. विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या डॉ. ज्योती गगनग्रास यांनी केले .डॅा प्रकाश दिक्षित, उपकार्यवाह व प्रा सुरेश तोडकर , सहकार्यवाह पी. ई. सोसायटी यांनी अभिनंदन केले.

See also  महिलांनी घेतला हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचा आनंद : अमोल बालवडकर.