सुखाई प्रतिष्ठान व युवाशक्ती संचालित मोफत अभ्यासिका वर्गाच्या उन्हाळी सुट्टीतील विशेष वर्गाचा शेवट शैक्षणिक सहलीने.

0

गणेशखिंड :

सुखाई प्रतिष्ठान व युवाशक्ती संचालित मोफत अभ्यासिका वर्गाच्या उन्हाळी सुट्टीतील विशेष वर्गाचा शेवट हा आज रविवार दि. १२/६/२०२२ आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीने झाला. ही सहल डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ या ठिकाणांवर झाली.

संग्रहालयातील अनुभव हा अत्यंत विलक्षण असा होता सर्व विद्यार्थी संग्रहालयातुन महामानवाची प्रेरणा घेऊन बाहेर पडले. यावेळी युवाशक्ती औंधरोड संस्थापक अध्यक्ष रोहित आगळे व सुखाई प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर सर्व विध्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेण्यात आले. तिथे विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेण्यात आले व सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी या सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.

या वेळी मार्गदर्शन करताना सुखाई प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे म्हणाले की अभ्यासिका वर्गामुळे मुलांना खुप काही शिकायला मिळाले. येणाऱ्या भविष्यातील शेक्षणिक वर्षात मुलांना या अभ्यासिकेचा निश्चित फायदा होणार आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही केलेला प्रयत्न निश्चीत यशस्वी होईल. या अभ्यास वर्गाचा शेवट शैक्षणिक सहलीने करताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटत आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा. आम्ही त्यासाठी हवी ती मदत करण्यास कायम तत्पर राहू.

यावेळी मोफत अभ्यासिका वर्गातील १०० विध्यार्थी व युवाशक्ती औंधरोड आणि सुखाई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

See also  सनी निम्हण यांच्या वतीने आयोजित जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 'सोसायटी गार्डन संगोपन अभियान'  ला मोठा प्रतिसाद