आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका उद्घाटन व प्रथमोपचार किट वाटप नितीन रणवरे यांचा उपक्रम

0

औंध :

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून युवा नेते नितीन रणवरे यांच्यावतीने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एकाच वेळी दोन रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा आणि परिसरामध्ये प्रथमत पाच हजार कुटुंबांना प्रथमोपचार पेटी चे वाटप रविवार दिनांक १२/०६/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता इंदिरा वसाहत औंध येथे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाची माहिती देताना भाजपा सदस्य युवा नेते नितीन रणवरे म्हणाले की, आमचे मार्गदर्शक आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नेहमीच समाजाची सेवा करावे असे मार्गदर्शन करत असतात व स्वतः देखिल अविरत जमेल तशी सेवा नागरीकांना देतात त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दोन रुग्णवाहिका सेवा लोकार्पण करत आहोत. तसेच पाच हजार कुटुंबांना अतिशय महत्वाची असणारी व उपयोगी पडेल अशी प्रथमोपचार पेटी देवुन सेवेतून दादांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, पुनीत जोशी, उमा गाडगीळ, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, बाळासाहेब रानवडे, अभिजीत गायकवाड, शिवम बालवडकर, गणेश कलापुरे, प्राजक्ता नितीन रणवरे, अस्मिता करंदीकर, सुधिर जोशी, गिरीश कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी औंध बाणेर बालेवाडी कस्तुरबा इंदिरा वसाहत परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नितीन रणवरे यांनी केले आहे.

See also  औंध येथील डी मार्ट मध्ये डिझेल चोरीचा प्रकार उघडकीस