कोल्हापूरच्या कस्तुरीने यशस्वी पणे सर केले सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर…

0

कोल्हापूर :

कोल्हापुरची 20 वर्षीय तरुणी कस्तुरी सावेकर हिने शनिवारी सकाळी जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केलं आहे.

विशेष म्हणजे 30 एप्रिल रोजी, कस्तुरीने गिर्यारोहणासाठी सर्वात धोकादायक पर्वतांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अन्नपूर्णा-एल शिखर देखील यशस्वीरित्या सर केलं. त्यामुळे ती माऊंट अन्नपूर्णा शिखर सर करणारी सर्वात तरुण मुलगी ठरली होती. त्यानंतर आता अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत तिने एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे.

गेल्या वर्षीही कस्तुरीने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु माऊंट एव्हरेस्टचं शिखर 3000 फूट अंतरावर असताना अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे तिला मागे फिरावं लागलं होतं. तिने ठरवलं होतं, की ती माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचं आपलं ध्येय नक्की पुर्ण करेल. त्यानुसार तिनं सराव सुरू ठेवला. सप्टेंबर 2021 मध्ये कस्तुरीने माऊंट मनास्लू (8163 मी) देखील यशस्वीरित्या सर केलं होतं अशी माहिती कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी दिली.

कस्तुरी सावेकर ही अवघ्या 20 वर्षांची आहे. कस्तुरीचा कल लहानपणापासूनच गिर्यारोहणाकडे होता. तिनं वडिलांसोबत सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये ट्रेकिंगला सुरुवात केली. कस्तुरीचे वडील दीपक सावेकर हे कार मेकॅनिक आहेत तर आई मनस्विनी सावेकर या गृहिणी आहेत.

आठ हजारांहून अधिक उंचीच्या शिखरांवर चढाई करतानाची आव्हानं वेगळी असतात. थंडी, 60 किमी प्रति तासांपेक्षा जास्त वेगानं वाहणारे वारे, बर्फवृष्टी आणि अत्यंत खडबडीत प्रदेशात कराव चढाई करणं अत्यंत कठीण असतं. हवेमध्ये ऑक्सिजनची पातळी फक्त 1% ते 2% टक्के असते. अशा परिस्थितीमध्ये चढाई करणे हा चमत्कारिक पराक्रम आहे. कस्तुरीने दाखवून दिलं की, मोठी स्वप्न साध्य करता येतात. सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या अनेक तरुण गिर्यारोहकांना आता हिमालय सर करण्याची प्रेरणा मिळेल अशा भावना तिचे प्रशिक्षक असलेल्या अमर आडके यांनी व्यक्त केल्या.

See also  डे नाईटस कसोटीच्या आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज .