वसुंधरा अभियान बाणेर कडून २११ रक्तदात्यांचे रक्तदान

0

बाणेर :

निसर्ग संवर्धनाचा वसा हाती घेतला असताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत 8 मे जागतिक थँलेसीमिया दिन व जागतिक रेडक्रॉस दिन निमित्ताने वसुंधरा अभियान बाणेर च्या वतीने १० वे रक्तदान शिबीर राम मंदिर बाणेर येथे आयोजित करण्यात आले .

अति प्रचंड उन्हाळा चालू असताना देखील, संस्थेच्या सदस्यांच्या सुयोग्य नियोजनाने आणि परिश्रमाने मोठ्या प्रमाणात रक्तदान दात्यांकडून करून घेतले गेले.
संस्थेच्या सोळा वर्षांमध्ये आयोजित केलेले आहे दहावे रक्तदान शिबिर आहे.

यावेळी २११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. १० वर्षातील सर्वात मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आले. यात महिलांचाही विशेष सहभाग होता. हभप विक्रम महाराज काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. जनकल्याण रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले या प्रसंगी जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ.अतुल कुलकर्णी, उपसंचालक डॉ.गणेश कांबळे, जनसंपर्क अधिकारी संतोष अन्होळकर उपस्थित होते. संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी थँलेसीमिया आजाराबद्दल माहिती दिली व सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

वसुंधरा रक्तदान शिबिराला बी.व्ही. जी. ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनीही सदिच्छा भेट देऊन निसर्ग संवर्धन सोबत, रक्तदानाचे महत्वाचे काम वसुंधरा अभियान मार्फत चालू असल्याबद्दल कौतुक केले. वसुंधरा अभियान मार्फत सर्व रक्तदात्यांना विविध झाडांची रोपे देऊन गौरविण्यात आले.

See also  सुतारवाडी पाषाण शिवसेनेच्या वतीने साफसफाई कर्मचाऱ्यांचा वृक्ष रोपटे देवून सन्मान