सुतारवाडी पाषाण शिवसेनेच्या वतीने साफसफाई कर्मचाऱ्यांचा वृक्ष रोपटे देवून सन्मान

0

सुतारवाडी :
सुतारवाडी पाषाण शिवसेनेच्या वतीने संतोष तोंडे शिवसेना विभाग प्रमुख यांचा कडून युवासेना प्रमुख पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे साहेब यांच्या वादिवसानिमित्त सुतारवाडी पाषाण परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांना वृक्ष रोप व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना काळात देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला परिसर स्वच्छ राहावा यादृष्टीने काम करणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम घेण्यात आला. सुतारवाडी भागातील उपस्थित ३५ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पाषाण येथील ३५ कर्मचार्‍यांचा सन्मान संजय निम्हण यांच्या संपर्क कार्यालय मध्ये घेण्यात आला.

या वेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी सांगितले की, कोरोना काळात देखील आपला परिसर स्वच्छ करण्याचे काम साफ सफाई कर्मचाऱ्यांनी केले. त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचे चांगले काम संतोष तोंडे यांनी शिवसेनेच्या वतीने केले, ही चांगली बाब आहे. शिवसेना नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्याचे कौतुक करत असते. असेच काम करत राहून शिवसेना वाढविण्या साठी एकत्रित प्रयत्न करावा असे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

कर्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे व उपशहर प्रमूख राजेंद्र धनकुडे यांचा हस्ते वाटप करण्यात आले. कर्यक्रमास विभाग संघटक संजय निम्हण, विभाग प्रमुख संतोष तोंडे, उपसंघटक दिनेश नाथ, युवा सेना अधिकारी अमित रणपिसे, ॠषिकेश कुलकर्णी, शाखा प्रमुख अजिंक्य सुतार, जेष्ठ शिव सेनिक लक्ष्मण दिघे, स्वातीताई रणपिसे, सुनिता रनावडे व शिवसैनिक उपस्थित होते.

See also  आरोग्य तपासणी मुळे रोगाचे निदान होते, रोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते : लहू बालवडकर.