आरोग्य तपासणी मुळे रोगाचे निदान होते, रोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते : लहू बालवडकर.

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी, बाणेर, सुस, म्हाळुंगे मधील सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिर ‘आरोग्यम धनसंपदा’ लहु बालवडकर सोशल वेलफेअर व कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरास परिसरातील ३०० नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्या करिता भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांच्यावतीने नेहमीच आरोग्यदायी सामाजिक योजना राबविल्या जात आहे.

या शिबिराची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची माहिती मिळण्याकरता आवश्यक असणारे मोफत आरोग्य शिबिर राबविले आहे. नागरिकांनी मोठ्या उत्साहात आपल्या आरोग्याची काळजी घेणे करता या आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवून आपली तपासणी करून घेतली. आरोग्य तपासणी मुळे रोगाचे निदान होते, रोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते यामुळे या आरोग्य शिबिराचे आयोजन महत्त्वाचे आहे. या पुढे देखील अश्याच प्रकारे सगळ्या पध्दतीचे छोटे छोटे शिबीरे नेहमीच घेणार आहोत.

या मोफत आरोग्य शिबिरामध्ये खालील प्रकारे तपासणी मोफत आणि सल्ला देण्यात आला.
१) हिमोग्लोबिन तपासणी
२) मधुमेह तपासणी
३) थायरॉईड तपासणी
४) बॉडी मास्क इंडेस्क तपासणी
५) मणक्याच्या विकारावर तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला (डॉ. राहुल चौधरी, MS Ortho ECFMG (USA))

See also  बावधन बुद्रुक येथे श्री खंडोबा देवस्थान मंदिर "चंपाषष्टी उत्सवा" निमित्त धार्मिक कार्यक्रम.