शिक्षकांना निवडणुका किंवा मतदार नोंदणीची कामे दिल्यास उच्च न्यायालयात जाऊ : शिक्षण संस्था महामंडळ

0

नागपूर :

मतदान याद्या तयार करण्यासाठी शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली आहे. मात्र, शिक्षकांना विद्यादानाव्यतिरिक्त इतर कामांचा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विरोध करत, निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

“शिक्षकांना निवडणुका किंवा मतदार नोंदणीची कामे दिल्यास उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा महामंडळाने दिला आहे. कोणत्याही निवडणुका आल्या की त्याच्याशी संबंधित कामांसाठी शिक्षकांना जुंपले जाते.

करोनामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनामुळे सत्राच्या शेवटी शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त भार आला आहे. अशा स्थितीत उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये शिक्षकांवर मतदार नोंदणीचे काम लादणे अन्यायकारक असून, हे निर्देश त्वरित मागे घ्यावे, अन्यथा न्यायालयात जाऊ” असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने निवेदनातून दिला आहे. “उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या संमतीविना त्यांना निवडणुकीचे काम देता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी केली आहे.

See also  अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार !