शांती सेठी यांची उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या कार्यवाहक सचिव आणि संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती

0

अमेरिका :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनात भारतीयांची भूमिका वाढत आहे. यामध्ये आता आणखी एका भारतीयाचा समावेश झाला आहे. शांती सेठी यांची उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या कार्यवाहक सचिव आणि संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शांती सेठी (Shanti Sethi) यांनी अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेची पहिली महिला कमांडर होण्याचा मानही मिळवला आहे. कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या वरिष्ठ सल्लागाराचा हवाला देत पॉलिटिकोने वृत्त दिले आहे की, सेठी यांना उपराष्ट्रपती कार्यालयात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, शांती सेठी या अमेरिकन नौदलाच्या प्रमुख युद्धनौकेच्या पहिल्या भारतीय अमेरिकन कमांडर होत्या. सेठी यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांचे काम उपराष्ट्रपतींच्या कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि कार्यकारी सचिव म्हणून काम करणे आहे. सेठी यांनी डिसेंबर 2010 ते मे 2012 या कालावधीत USS Decatur या मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणालीचे नेतृत्व केले. लष्करी प्रतिष्ठानांमध्ये जबाबदारी स्वीकारल्यानंतर 2015 मध्ये त्यांना रॅंक ऑफ कॅप्टन पदावर बढती मिळाली. विशेष म्हणजे भारताला भेट देणार्‍या अमेरिकन नौदलाच्या जहाजाच्या त्या पहिल्या महिला कमांडर होत्या. सेठी 1993 मध्ये यूएस नेव्हीमध्ये सामील झाल्या. त्यानंतर कॉम्बॅट एक्सक्लुजन कायदा लागू झाला, याचा अर्थ असा की, गैर-अमेरिकनांना लष्करात मर्यादित जबाबदारी दिली जात होती. परंतु त्या अधिकारी असतानाच कॉम्बॅट एक्सक्लुजन कायदा लागू होता. मात्र हा कायदा हटल्यानंतर पुरुषी बंधने झुगारुन सैन्यात मोठी जबाबदारी घेण्याची त्यांना संधी मिळाली.

तसेच, शांती सेठी यांचे वडील 1960 च्या दशकात भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले. त्याच वेळी, कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या राजकारण्यांपैकी एक आहेत, ज्यांनी आतापर्यंत अमेरिकन राजकारणात उपराष्ट्रपती या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्या आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. सेठी यांनी 2021-22 मध्ये नौदल सचिवांचे वरिष्ठ लष्करी सल्लागार म्हणूनही काम केले आहे. शांती सेठी या मूळच्या नेवाडा येथील असून त्यांनी नॉर्विच विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या इलियट स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेयर्समधून आंतरराष्ट्रीय धोरण आणि सराव मध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या माजी नौदल अधिकारी शांती सेठी यांची उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या कार्यवाहक सचिव आणि संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

See also  रशियाच्या स्पुटनिक- V लशीच्या दीड लाख डोसची पहिली बॅच भारतात दाखल

याशिवाय, पॉलिटिकोने उपाध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार हर्बे झिस्केन्डी यांचा हवाला देत म्हटले की, सेठी यांची अलीकडेच हॅरिस यांच्या कार्यालयात नियुक्ती झाली. अमेरिकन नौदलाच्या मोठ्या युद्धनौकेच्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन कमांडर होत्या.