पुण्यात आज केवळ पावणे अकरा पर्यंत हॉटेल पार्सल सेवेस परवानगी.

0

पुणे

जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी आले आहे. नुकतंच राज्य सरकारने 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. यानुसार यंदा नागरिकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरी साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, अशी महत्तवपूर्ण मार्गदर्शक सुचना जारी केली आहे.

राज्यामध्ये कोरोनाचे संकट पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने खबरदारीच्या दृष्टीने ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असे जाहीर केले असून मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

या घोषणेनंतर पुण्याच्या आयुक्तांनीही लगेचच एक पत्रक जारी करत या मिशन बिगीन अगेनसोबतच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी म्हणजेच ३१ डिसेंबरसाठी नियमावली जारी केली आहे. विशेष म्हणजे ११ वाजल्यानंतर संचारबंदीची घोषणा करण्यात आली असतानाच ३१ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये हॉटेलमधून येणारी होम डिलिव्हरीही केवळ पावणे अकरापर्यंत सुरु राहणार असल्याचे या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

See also  महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार : रमेश बागवे