बावधन येथील शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजाराचे उद्घाटन प्रशांत जगताप यांच्या हस्ते पार. सुर्यकांत भुंडे यांचा उपक्रम…

0

बावधन :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सुर्यकांत भुंडे आणि सौ. सुजाता भुंडे यांच्या माध्यमातुन बावधन येथे “शेतकरी ते थेट ग्राहक” आठवडे बाजार उदघाटन समारंभ माजी महापौर प्रशांत जगताप (अध्यक्ष, पुणे शहर रा. काँ. पार्टी ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

त्याबद्दलची माहिती देताना युवा नेते सूर्यकांत भुंडे यांनी सांगितले की, बावधन परिसरातील नागरिकांसाठी दैनंदिन जीवनात आवश्यक असणारा आठवडे बाजार सुरु करत आहे. या आठवडी बाजारामध्ये ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ भाजीपाला उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अतिशय माफक दरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणारा भाजीपाला विविध फळे कडधान्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना निश्चितच त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

“शेतकरी ते थेट ग्राहक” आठवडे बाजारचे उदघाटन करताना माजी महापौर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, युवा नेते सुर्यकांत भुंडे आणि त्यांच्या पत्नी सुजाता भुंडे यांच्या माध्यमातून सुरू होणारा आठवडे बाजार परिसरातील नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे. गावकीचा असणार आठवडे बाजार नव्या पद्धतीने सुरू होत आहे. त्यामध्ये नागरिकांच्या गरजा भागविणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू मिळत आहेत. युवा नेते सुर्यकांत भुंडे परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. भविष्यात असेच प्रकार चे चांगले काम त्यांच्यामार्फत होईल. त्याची दखल बावधन परिसरातील नागरिक निश्चित घेतील.

या वेळी राष्ट्रवादी काँगेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुनील चांदेरे (उपाध्यक्ष PDCCबँक ), सविता दगडे (मा. जि प अध्यक्षा), महादेव अण्णा कोंढरे (मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष ), प्रमोद निम्हण (मा. नगर सेवक ), रोहिणी ताई चिमटे (मा नगरसेविका ), राधिका कोंढरे ( मा. सभापती ), दिलीप दगडे ( मा. सरपंच ), बबनराव मारुती दगडे ( मा. सरपंच ), बबनराव लक्ष्मण दगडे ( मा पोलीस पाटील ), राजेंद्र भुंडे ( मा. सरपंच ), बालम सुतार मा स्वि.नगरसेवक ,गोरख रावसाहेब दगडे ( मा. कृषी उत्पन्न बाजार संचालाक), दिपक दगडे ( मा. उपसरपंच ), राजेंद्र दत्तोबा दगडे (सा का ), राजेंद्र सुदाम दगडे ( तंटामुक्ती अध्यक्ष), सचिन बबन दगडे (ग्रा प सदस्य ), आझाद दगडे ( ग्रा प सदस्य), योगेश सुतार ( राष्ट्रवादी युवा नेते ), सुहास दगडे, महेश हांडे, राजेंद्र भुंडे (ग्रा.प.सदस्य)रेश्मा केदारी, कल्पना घुले ( ग्रा प सदस्य), आशा भुंडे (ग्रा प सदस्य), अभिजित दगडे ( युवा नेते ), अमोल दगडे(मा.उपसरपंच )बापु दगडे (मा उपसरपंच ), रोहिनी सुतार, ऊज्वला जाधव, गणेश दगडे (मा.उपसरपंच ), पांडुरंग दगडे, चंद्रकांत दगडे, प्रदीप हुमे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय नारायण सुर्वे यांचे आज अल्पशा आजाराने निधन