लोकशाहीत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे- डाॅ धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण विभाग

0

गणेशखिंड :

गणेशखिंड येथिल. प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालय व सहसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 25 जानेवारी 2022 रोजी ” राष्ट्रीय मतदार दिन ” साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमास डॉ. धनराज माने (मा. संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ) तसेच डॉ. किरणकुमार बोंदर (मा. सहसंचालक , उच्च शिक्षण , पुणे विभाग ,पुणे ), प्राचार्य डॉ. संजय खरात सर व उपप्रचार्य उपस्थित होते .

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातर्फे 17 जानेवरी ते 22 जानेवारी दरम्यान जिल्हा स्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धे मध्ये एकून 300 निबंध व चित्रकलेमधे 85 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. त्या स्पर्धेचे निकालही आज घोषित करण्यात आले.

या कार्यक्रमात मतदान करण्याबाबत शपथ घेण्यात आली. या प्रसंगी बोलताना मा. धनराज माने म्हणाले,”लोकशाहीत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. सृदृढ लोकशाहीची ती गरज आहे. म्हणून मतदानच प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा व भारतीय लोकशाहीची मुल्ये जोपासा”

यानंतर प्रा. संदीप सानप यांनी स्पर्धेचे विजेते जाहीर केले.
निबंध स्पर्धेचे पारीतोषिक विजेते –

१. देडे महेश भाऊसाहेब (आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय, पुणे )
२. मुधोळकर डिंपल किरण (आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय, पुणे)
३.सुतार उज्वला गुलाब (बी. डी. काळे महाविद्यालय, घोडेगाव, जि. पुणे)

व उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते-

१. चिखले ऋतुजा सुभाष (मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे)
२.अनुग्या चंद्रवंशी (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे) या स्पर्धेला परिक्षक म्हनूण डाॅ. संस्कृती अवलगावकर (मराठी) डाॅ. दिपनीता भांजा (ईंग्रजी) व डाॅ. सविता सबनीस (हिंदी) यांनी काम पाहिले.

चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक विजेते-
१. वंजारी नंदिनी राजेंद्र (बाबुरावजी घोलप महाविद्यालय, पुणे)
२. विभूते अंकिता राजशेखर ( मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे)
३. गवळी रचना अर्जुन (मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे)

See also  ऑक्सिजन पुरवठा कमी पडू लागल्या मुळे आरोग्य सेवेत गोंधळ

उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते –

१. सुतार उज्वला गुलाब ( बी. डी. काळे महाविद्यालय, घोडेगाव, जि. पुणे)
२.कोळपकर ऋतुजा (मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे)
चित्रकला स्पर्धे साठी परीक्षक म्हनूण डाॅ. गौरी कोपर्डेकर, प्रा. राजेंद्र भोईवार व प्रा. संदीप सानप यांनी परिक्षण केले.

कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ. गौरी कोपर्डेकर व आभार डॉ. ज्योती जोशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे समन्वय प्रा. संदीप सानप यांनी केले.

या कार्यक्रमास ३६ जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह,पी ई सोसायटी व डॉ. प्रकाश दिक्षीत, उपकार्यवाह , पी. ई. सोसायटी यांनी अभिनंदन केले. पी ई सोसायटीचे सेक्रेटरी प्रा श्यामकांत देशमुख यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.