अपहरण केलेला मुलगा अखेर आठ दिवसांनी सापडला….! पोलिसांची शोध मोहिम यशस्वी….!

0

पुणे :

बालेवाडी येथील डॉ. सतीश चव्हाण यांचा अपहरण झालेला चिमुरडा सापडला. स्वर्णव चव्हाण (डुग्गु),वय 4, असं या मुलाचं नाव आहे. या मुलाचं बालेवाडी हायस्ट्रीट राम इंदू पार्क येथून अपहरण झाले होते. सदर घटनेने संपुर्ण परीसर हळहळला होता.

पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती. खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास तीनशे ते साडेतीनशेच्या वर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या मुलांचा शोध घेत होते.

अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलंय. चतु:श्रुगी पोलिसात याबाबत तक्रार नोंद करण्यात आली होती. या मुलाचं कशासाठी अपहरण केलं किंवा का केलं याचं कारण पोलीस शोधत आहेत. गेले आठ दिवसांपासून पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर या मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आलं आहे.

या मुलाचं कोणी अपहरण केलं हे मात्र अजून कळू शकते नाही. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

See also  बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथील अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी "मोफत लसीकरण मोहिम”