बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथील अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी “मोफत लसीकरण मोहिम”

0

बालेवाडी :

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथील अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी “मोफत लसीकरण मोहिम” सेवा आरोग्य, बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक, पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान, सिरम इन्सिट्युट ॲाफ इंडिया, PPCR यांच्या सौजन्याने व शाश्वत रूग्णालय व लोकविकास मंडळ यांच्या सहयोगाने लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी-बाणेर येथील “फर्स्ट एड पॉलीक्लिनिक” येथे सूरू केली आहे.

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, या परिसरातील सर्व सामान्य नागरीकांना भेडवसानाऱ्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी आपल्या संकल्पनेतून विविध प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत गरजू लोकांना मदत करण्याचे काम केले आहे. या वेळी त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन ज्या अल्प उत्पन्न धारक लोकांना लसीकरण करणे आतापर्यंत शक्य झाले नाही त्या अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी “मोफत लसीकरण मोहिम” सर्व सहयोगी संस्थेच्या मदतीने सुरू केली आहे.

याची माहिती देताना भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते लहू बालवडकर यांनी सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अल्पउत्पन्न धारक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षीत राहावे यासाठी त्यांच्या आवाक्याबाहेर असणारे लसीकरण त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न “मोफत लसीकरण मोहिम” राबवून करत आहे. बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या परिसरातील शेवटच्या नागरिकापर्यंत लस पोहोचविण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. ज्या अल्पउत्पन्न धारक नागरिकांनी अजून पर्यंत लसीकरण केले नाही, त्यांनी स्वतःच्या सुरक्षितते करिता लसीकरण करून घ्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

 

लहू बालवडकर यांनी ही मोहीम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केलेल्या सर्व सहयोगी संस्थांचे मनापासून आभार मानले. नागरिकांनी देखील स्वतःच्या सुरक्षतेसाठी लसीकरण करून घेण्यास सुरुवात केली असून आत्तापर्यंत जवळपास ५०० लोकांनी लसीकरण करून घेतले आहे.

 

See also  माहेश्वरी समाज बाणेर - बालेवाडी यांस कडून स्मशानाभूमी साठी स्वर्गारोहण स्टिलची शिडी लोकार्पण.