सुतारवाडी, पाषाण, सुसरोड, बावधन परिसरातील कष्टकरी व्यवसायिकांना शिवसेनेचे वतीने दिवाळी भेट.

0

पाषाण :

यावेळी दिवाळीचा उत्साह वेगळाचआहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. म्हणुनच पाषाण, सुसरोड, सुतारवाडी बावधन, परीसरातील कष्टकरी पानटपरी वाला, सलून वाला, रिक्षावाले, चप्पल दुरुस्तीचे काम करनारे, तसेच डॉक्टर, मेडिकल व परीसरातील सफाई कामगार यांना शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे आणि रूपाली संतोष तोंडे यांच्यावतीने दिपावलीच्या शुभेच्छा व दिवाळी भेट देण्यात आली.

या बद्दल मॅक न्यूज ला माहिती देताना शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे यांनी सांगितले की, आपल्या बरोबरच आपल्या परिसरातील गोर गरीब कुटुंबातील दिवाळी देखील आनंदाची उत्साहाची आरोग्यदायी जावी म्हणून, दिवाळीच्या निमीत्ताने सर्व सामान्यांना एक छोटीसी भेट देवून त्यांच्या आनंदात सहभागी होता आले याचे समाधान आहे.

 

शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे व रुपाली संतोष तोंडे यांच्या कडून व राजेंद्र धनकुडे उपशहरप्रमुख, उपशहर संघटक आशुतोष आमले, अजिंक्य सुतार शाखा प्रमुख, सुनिल राजगुरू शाखा प्रमुख, लक्षण दिघे विजय दाभाडे , महेश सुतार,अमोल फाले, रोहित लोंढे, मंगेश खळदकर, महिला आघाडीच्या स्वाती रणपिसे, रानवडे ताई, संग्राम तोंडे, सुधांशु तोंडे व शिवसैनिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

See also  सिलेंडर मुक्त पुणे करायचे आहे : खासदार गिरीश बापट