सिलेंडर मुक्त पुणे करायचे आहे : खासदार गिरीश बापट

0

बाणेर प्रतिनिधी :

सामान्य माणसाचे जीवन सुखमय होण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुणेकरांना देण्यात येणार आहे. त्यातीलच एक सुविधा म्हणजे सिलेंडर मुक्त पुणे करायचे आहे. सिलेंडर मुक्त झाल्यामुळे सिलेंडरचे असलेले धोके कमी होणार आहे. पुणे शहरात प्रत्येक भागात  MNGL नॅचरल पाईप लाईन गॅस द्वारे प्रत्येक घरात गॅस पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.

बाणेर येथील ॲार्किड टॅावर्स सोसायटीत खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते MNGL नॅचरल गॅस पाईप लाईनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यावेळी कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, चेअरमन सुबोध सायखेडकर, सेक्रेटरी आरती राव, गोविंद सुर्यवंशी, प्रविण कुलंगे, अमोद वाणी, लोकेंद्र सिंग, पलक शहा तसेच MNGL चे एम.डी.सुप्रियो हलदार, संतोष सोनटक्के, सचिन काळे, राहुल धानोरकर व इतर सहकारी कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना बापट म्हणाले की, ज्या पद्धतीने सोसायटी मध्ये तोटी चालू केली गॅस मिळणार आहे, त्याच पद्धतीने तोटी सुरू केल्यास २४ बाय ७ पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यकाळात गॅस ची तोटी उघडली कि गॅस व पाण्याची तोटी उघडले की पाणी अशा सुविधा येथील नागरिकांना मिळणार आहेत.

याप्रसंगी बोलताना अमोल बालवडकर यांनी सांगितले की, आजपर्यंत प्रभागातील सुमारे १०८ सोसायटीं मधील ७००० कुटुंबांना हे गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. तसेच येत्या दोन महिन्यात सुमारे ७० सोसायटींमध्ये हि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

See also  पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त प्रभात ९ मध्ये जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप...!