मोबाईल चोरणाऱ्याला नागरिकांनी पकडून दिला पोलिसांच्या ताब्यात.

0

पुणे:

ऑफिसमधील काम संपवून घरी जाण्यासाठी कंपनीच्या गेटबाहेर कारची वाट बघत उभ्या असणाऱ्या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडून येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. येरवड्यातील आयबीएम कंपनीच्या गेटसमोर ही घटना घडली.

पुण्यात शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना काल, रात्री येरवड्यात घडली. इंजिनीअर असलेली तरुणी ऑफिसमधील काम संपवून घरी जाण्यासाठी तिच्या कंपनीच्या गेटबाहेर वाहनाची वाट बघत उभी होती. ती मोबाईलवर बोलत होती. त्याचवेळी एक जण अचानक तिथे आला आणि तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जात होता.

अचानक घडलेल्या या प्रकाराने तरुणी घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी आणि कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी चोराचा पाठलाग केला. त्याला पकडले. राम केदार असे २३ वर्षीय आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

See also  ‘कोविडशिल्ड’चे पाच कोटी डोस भारताला सर्वात आधी मिळणार – अदर पुनावाला.