हिंजवडी येथे कायदेविषयक जनजागृतीचे शिबीर

0
slider_4552

हिंजवडी :

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्रामपंचायत हिंजवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ७/११/२०२१ रोजी हिंजवडी येथील ग्रामपंचायत ऑफिसचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित केले होते.

सदर शिबीरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून संजय देशमुख, प्रमुख जिल्हा न्यायाधिश पुणे तथा अध्यक्ष पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण हे होते. त्यांचा सन्मान हिंजवडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विक्रमजी साखरे यांच्या हस्ते शिंदेशाही पगडी, शाल, व बुखे देऊन करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंजवडी ग्रामपंचायत सदस्य तसेच संत तुकाराम सहकारी कारखान्याचे माजी संचालक वसंतरावजी साखरे यांनी केले. सदर कार्यक्रमात उपस्थित असणार्‍या व्यक्तींचे स्वागत मुळशी बार असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष ॲड. अंकुश ववले यांनी केले.

सदर कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ विधीतज्ञ डॉ. सुधाकरराव आव्हाड यांनी मुळशी भागामध्ये अतिशय जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा व सर्व नागरिकांच्या इच्छेनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रारुप विकास आराखडा :- आरक्षणे व झोनिंग संदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले. सदर शिबीरामध्ये ज्येष्ठ विधीतज्ञ पांडुरंग थोरवे यांनी शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला सरकारी मोजणी व त्यासंबंधीत महत्त्वाची परिपत्रके या विषयावरील विविध परिपत्रकांसंदर्भात अगदी सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा पद्धतीने बहुमोल असे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून संजय देशमुख,  प्रमुख जिल्हा न्यायाधिश पुणे तथा अध्यक्ष पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांनी विधी साक्षरता अभियान अंतर्गत पॅन इंडिया तसेच महिलांचे अधिकार या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे हिंजवडी गावच्या महिला उपसरपंच प्रतिज्ञा घोटकुले-जांभुळकर यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये हिंजवडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विक्रम वसंतराव साखरे तसेच उपसरपंच प्रतिक्षा शिवाजी घोटकुले यांचा सन्मान ज्येष्ठ विधीतज्ञ पांडुरंग थोरवे संस्थापक अध्यक्ष विधीनिती प्रतिष्ठान यांचेवतीने ॲड. संतोष जाधव व ॲड. पुनम शेलार, तसेच ॲड. सुशांत पोतले यांनी केला. तसेच मुळशी बार असोसिएशन व दुय्यम निबंधक हिंजवडी २ येथील ॲड. राक्षे, ॲड. श्रीकांत बुचुडे, ॲड. निलेश जांभुळकर तसेच अन्य वकील सभासदांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड बार असोसिएशन नवनिर्वाचित सचिव म्हणून निखिल बोडके यांचा सन्मान करण्यात आला.

See also  मुळशी मध्ये आत्माराम कलाटे आणि सुनील चांदेरे यांच्यात जोरदार लढत : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुक

सदर कार्यक्रमास हिंजवडी ग्रामपंचायतीचे सभासद, ग्रामस्थ व पंचक्रोषीतील ग्रामस्थ, मुळशी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व वकील बांधव, तसेच दुय्यम निबंधक मुळशी २ येथील मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता. तसेच सदर पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष संतोषजी जाधव व रुपेशजी कलाटे तसेच ॲड. कल्याण शिंदे, ॲड. अमित आव्हाड, ॲड. समीर भुंडे, ॲड. माणिक रायकर, ॲड. चंद्रकात दगडे, ॲड. वर्षा मुरकुटे, ॲड. सई जोशी, ॲड. श्रद्धा जाधव, ॲड. अमोल नखाते, ॲड. प्रमोद नढे, तसेच पुणे बार असोसिएशनचे मोठ्या संख्येने वकील बांधव हजर होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे सचिव ॲड. प्रविण नलवडे यांनी केले आहे. सदरच्या देखणा व भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन ॲड. पांडुरंग थोरवे यांनी केले आहे.  पुणे बार असोसिएशन, पिंपरी बार असोसिएशन, मुळशी बार असोसिएशन यातील बरेच सभासद सदर कार्यक्रमास हजर होते.