सचिन दळवी मित्र परिवाराकडून गोरगरिबांना फराळ वाटप.

0

सोमेश्वरवाडी :

दिवाळी हा सणआनंदाचा उत्साहाचा परंतू मागील बराच काळ कोरोना मुळे कोणतेच सण कोणालाही साजरे करता आले नाही. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यावेळी सर्व सामान्य माणसांसाठी दिवाळी गोड व्हावी म्हणून सचिन दळवी मित्र परिवार यांच्या माध्यमातून सोमेश्वरवाडी, कृष्णनगर, संध्यानगर, साईनगर, कल्पना नगर या मधील गोरगरीब नागरिकांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

याबद्दल माहिती देताना सचिन दळवी यांनी सांगितले की, कोरोना मुळे सर्व सामान्य माणसाचा आर्थिक कणा मोडला आहे. अशा परिस्थितीत त्यांची दिवाळी गोड करण्याचा हेतू समोर ठेवून दिवाळीचा फराळ वाटप करण्यात येत आहे. ही दिवाळी सर्वांना आनंदाची उत्साहाची आरोग्यदायी आणि भरभराटीची जावो अशा सदिच्छा! दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा !

यावेळी उपस्थित सर्व सोमेश्वरवाडीतील ग्रामस्थ व रवींद्र जोरे, तारामण जाधव, दीपक जाधव, बाळासाहेब येवले, राजाभाऊ बामगुडे, राहुल शिंदे, प्रदीप आरगडे, मंगेश बामगुडे, सूर्यकांत दळवी, किरण झाडाने, प्रमोद काकडे, रामभाऊ जाधव, बाबू कोदरे, विनय निम्हण, निखिल सपकाळ, अमोल जोरे, गोकुळ जाधव, राहुल जाधव, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 

See also  शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांचे बाणेर येथे स्वागत : शिवसेनेच्या कामाचा घेतला आढावा!