शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांचे बाणेर येथे स्वागत : शिवसेनेच्या कामाचा घेतला आढावा!

0

बाणेर :

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांचे पुण्यनगरीमध्ये बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी परिसरातील शिवसैनिकांच्या वतीने उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या माध्यमातून बाणेर येथे स्वागत करण्यात आले.

आगामी पालिका निवडणुकीमध्ये बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरामध्ये शिवसेना काम करत असल्याचा आढावा, तसेच शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मोर्चेबांधणी कशा प्रकारे सुरू आहे. याची माहिती यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सचिन आहेर यांना देण्यात आली.

या भेटीची माहिती मॅक न्यूज ला देताना उपशहर प्रमूख राजेन्द्र धनकुडे यांनी सांगितले की, येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी पक्षाचा संघटनात्मक बांधणी चा आढावा घेतला व संघटनेला अजून बळकटी देवून पक्ष वाढविण्यास मदत होईल अशा सूचना संपर्क प्रमुख सचिन आहेर यांच्याकडून देण्यात आल्या.

यावेळी उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, उप जिल्हा प्रमुख संतोष दादा मोहोळ, विभाग प्रमुख संतोष तोंडे, पांडुरंग बालवडकर, शिवसैनिक अशोक, नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष महेश सुतार आदी उपस्थित होते.

 

See also  रोहन कोकाटे यांनी सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस केला साजरा.